मुंबईः दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी आज नितेश राणे यांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना संजना घाडी यांनी राणे कुटुंबियांची खिल्ली उडवली.
संजना घाडी म्हणाल्या, ‘ नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांची आधी नार्को टेस्ट झाली पाहिजे. यांच्या बायका का टिकत नव्हत्या? यांच्या घरातले टीव्ही का फुटत होते? सिंधुदुर्गातल्या घराघरात हे माहिती आहे. नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल. कधी काँग्रेस, कधी बीजेपीला कधी शिवसेनेला शिव्या घालतायत.. कुठला पक्ष ठेवलाय का तुम्ही? असा सवाल संजना घाडींनी केला.

दरम्यान, आदित्य ठाकरेंविरोधात बोलणाऱ्या बंडखोरांविरोधात शिवसेनेची महिला आघाडी यावेळी एकवटलेली दिसली. आम्ही महिला मिळूनच यांना उत्तर देऊ, अशी भूमिका संजना घाडी यांनी मांडली.