नागपूर : विधानसभा अध्यक्षांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जंयत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, आता स्वत: जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पाटील म्हणाले, “कोणतेही आयुध नसताना अचानक सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलतात. सत्ताधारी पक्षाचे 14 सदस्य बोलतात बाकीच्यांना बोलू देत नाहीत. मी आवाहन केले निर्लज्जपणा सारखे वागू नका. माझा माईक चालू नसताना बोललो. तरीदेखील आज हा निलंबनाचा ठराव मांडला गेला, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

तसेच ते पुढे म्हणाले, “निर्लज्जपणा आपण सहजासहजी बोलतो. शेवटी सभागृहाने निर्णय घेतला आहे. माझ्याकडून कुणाचाही अवमान करण्याचा उद्देश नव्हता. मात्र सध्या जे सुरु आहे ते लोकशाहीच्या विरोधात आहे”, असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं.