पुणे: पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी आज, २२ डिसेंबर २०२२ ला दुपारी ३ः३० वाजता अखेरचा श्वास घेतला.
माहितीनुसार, पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांचे निधन झाले.

दरम्यान, कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी करत आहेत.