मुंबई: चीनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना व्हेरिएंटची भारतातही रुग्ण आढळली आहे. यापार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना आढावा बैठक बोलावली असताना आता दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोरोनासंदर्भात बैठक बोलावली आहे.
आज दुपारी ३.१५ वाजता विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत कोविड नियंत्रण आढावा बैठक होणार आहे.

दरम्यान, या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून राज्यात पुन्हा मास्कसक्तीबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.