Latest Marathi News

BREAKING NEWS

“….त्यामुळे देवेंद्र फडणवीस तात्काळ राजीनामा द्या”: ‘यांची’ मोठी मागणी!

0 331

नागपूर: रश्मी शुक्ला प्रकरणावरून विरोधकांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घेरलं आहे. शुक्ला यांना क्लीनचिट देणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 

यावेळी नाना पटोले म्हणाले, “फोन टॅपिंग आदेशाने चालले होते का? काही पत्रकारांचे फोन टॅपिंग झाले होते का? रश्मी शुक्ला यांच्याबाबत काही प्रतिक्रिया आल्या आणि त्या दोषी आढळल्या. सरकार बदललं आणि त्यांना क्लिीनचिट दिली. पण सरकारला कोर्टाने धारेवर धरले आहे. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तेव्हा पत्रकार, राजकीय लोकांचे आणि अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले जात होते. फोन टॅपिंग करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Manganga

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!