Latest Marathi News

BREAKING NEWS

“…तशीच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा”: ‘यांची’ आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत मोठी मागणी!

0 196

मुंबई : भाजपचे नेते नितेश राणे यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सुशांत सिंह राजपूत केसचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा फक्त आदित्य ठाकरे यांचंच नाव का समोर येतं? दाल में जरूर कुछ काला है! आदित्य ठाकरे यांचा या केसशी संबंध आहे. त्यामुळे याची व्यवस्थित चौकशी व्हायला हवी, असं नितेश राणे म्हणालेत.

 

 

तसेच ते पुढे म्हणाले,“A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच!”, असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

Manganga

 

दरम्यान, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!