मुंबई : अमृता फडणवीस यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात ‘महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि मोदीजी नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
‘अमृता वहिनी तुम्ही आज जे वक्तव्य केलं आहे, जुना बाप नवीन बाप, काय आहे हे..? अमृता वहिनी तुमच्यावरचे संस्कार आम्हाला माहिती नाही. बाप एकच असतो. दोन बाप नसतात, आमच्यावर ते संस्कारही नाहीये. तुमच्यावरच्या संस्काराची चाचपणी करा’, असा घणाघात संगीता तिवारी यांनी अमृता फडणवीसांवर केला आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, ‘अहो देवेंद्र भाऊ जरा बायकोला समजवा, ताईंना समजवा. नाहीतर फार कठीण होईल, जर अमृता फडणवीस यांनी आपले शब्द पाठीमागे घेतले नाही तर आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरू’, असा इशाराही संगीता तिवारी यांनी दिला आहे.