नवी दिल्ली: चीनमधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतातही दोन नवे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन अलर्ट झालं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने कोरोना संदर्भात बैठक बोलावली आहे.
माहितीनुसार, चीनमध्ये ज्या BF.7 या व्हेरिएंटने हेदौस माजवला आहे. या BF.7 चे भारतात आतापर्यंत चार रुग्ण आढळले आहेत. गुजरात आणि ओडिशात या व्हेरिएंटचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दुपारी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.तसेच, भारतातील नागरिकांनाही आता कोरोनाबाबत जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे.