आटपाडी : लिंगीवरेच्या माजी लोकनियुक्त सरपंचाला जीवे मारण्याची धमकी
आटपाडी तालुक्यातील लिंगीवरेच्या माजी लोकनियुक्त सरपंचाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार आटपाडी पोलिसात दाखल झाली आहे
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील लिंगीवरेच्या माजी लोकनियुक्त सरपंचाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार आटपाडी पोलिसात दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लिंगीवरेचे माजी लोकनियुक्त सरपंच विराज बापूसाहेब पुजारी यांना आरोपी हणमंत पोपट बुधावले रा. लिंगीवरे व आरोपी सुशांत विकास चव्हाण रा. देवापूर तां. माण, जि. सातारा या आरोपींनी निवडणुकीच्या कारणावरून दिनांक २१ रोजी विराज बापूसाहेब पुजारी यांना मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळी करत आरोपी सुशांत विकास चव्हाण याने तलवार घेवून फिर्यादीला जीवे मरणाची धमकी देवू लागला.

याबाबतची फिर्याद विराज बापूसाहेब पुजारी यांनी आटपाडी पोलिसात दिली असून आरोपी हणमंत पोपट बुधावले रा. लिंगीवरे व आरोपी सुशांत विकास चव्हाण रा. देवापूर तां. माण, जि. सातारा यांच्यावर कलम ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून सदर घटनेचा अधिक तपास पोना मोरे करीत आहेत.