Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, गुरुवार २२ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 821

मेष:-
दिवस संमिश्र असेल. उगाचच निराश होऊ नका. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. भविष्याची फार चिंता करू नका. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल.

 

 

वृषभ:-
जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. भागीदारीत फार विसंबून राहू नका. आजचा अंतिम निर्णय तुमचा असेल.कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंददायी अनुभव येतील.

Manganga

 

मिथुन:-
आज कामाचा थकवा येईल. मतभेदाला बळी पडू नका.परंतु आळस झटकून कामाला लागावे. कोणावरही अति विश्वास ठेऊ नका. उगाच उदास होऊ नका.

 

कर्क:-
आवडता छंद पूर्ण करता येईल. उगाचच रेंगाळत बसून राहू नका. जुगारापासून सावध राहावे. वेळेचा सदुपयोग करावा. एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल.

 

सिंह:-
काही नवीन खरेदी करता येईल. मनात शंकेला थारा देऊ नका. घरात टापटीप ठेवाल. सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. शैक्षणिक अडचणी दूर होतील.

 

कन्या:-
शंकेचे समाधान करून घ्याल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. नसते साहस दाखवायला जाऊ नका. प्रवासाचा सुखद अनुभव घ्याल. दुचाकी वाहन जपून चालवावे.

 

तूळ:-
इच्छेविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. मोकळ्या स्वभावाने लोकांचे मन जिंकाल. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या कामातून लाभ संभवतो.

 

वृश्चिक:-
आपलेच मत खरे कराल. अतिसंवेदनशीलता दाखवू नका. नवीन मार्गांचा विचार कराल. वाईट गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

 

धनू:-
आजचा दिवस सामान्य असेल. भावांकडून मदत मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. मोहाळा बळी पडू नका. कोणावरही विसंबून राहू नका.

 

मकर:-
सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल. आपल्या क्षमतेचा योग्य वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. खरेदी करताना सावध राहावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात.

 

कुंभ:-
व्यवसायिकांनी नवीन धोरण आखायला हरकत नाही. कार्यालयीन कामात गोंधळ उडू शकतो. एकावेळी अनेक कामे हाताळू नका. चित्त स्थिर ठेवावे. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल.

 

मीन:-
भाग्याची चांगली साथ मिळेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल.नवीन गुंतवणूक करता येईल. त्यातून चांगला नफा मिळेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!