नागपूर : चीनमध्ये कोरोनाचं थैमान सुरु असताना, राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी राज्यात मास्क सक्ती करायची की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असंही तानाजी सावंत यांनी सांगितलं.
केंद्र सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे पालन केले जाईल. चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या BF7 व्हेरिएंटचे सध्या चार रुग्ण देशात आहेत. पण महाराष्ट्रात तरी या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळला नाही. मात्र आरोग्य विभागा सतर्क आहे. राज्यात लसीकरण, डॉक्टर, औषधे या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. टेस्टिंग, ट्रॅकिंग, लसीकरण या संदर्भात तानाजी सावंत यांनीसूचना दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील कोविड-19 परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या समन्वयाने एक टास्क फोर्स तयार करेल. जे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवेल. ही टास्क फोर्स राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत सर्व माहिती सरकारला देईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.