मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम आता पुन्हा एकदा वाढला आहे. त्यांच्या जामीनाला आता येत्या 27 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना तुर्तास तरी दिलासा मिळणार नाही.
माहितीनुसार, अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने हायकोर्टात धाव घेत दहा दिवसांची स्थगितीची विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.

दरम्यान, ती मुदत उद्या संपत असताना सीबीआयने पुन्हा एकदा 27 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मिळावी अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सीबीआयची ही विनंती स्वीकारली आहे. मात्र इथून पुढे कोणतीही विनंती मान्य करणार नसल्याचं देखील कोर्टाने स्पष्ट केलं आहे.