मुंबई: महाराष्ट्र सरकार आता कोरोना नमुन्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग करणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जगभरातील वाढता कोरोना संसर्ग पाहता केंद्रांना राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या होत्या. या सूचना गांभीर्याने घेत राज्य सरकारने नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला असून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
महाराष्ट्र आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय खंदारे यांनी सांगितलं आहे की, ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, राज्यातील कोरोना रुग्णांचे सर्व नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी मुंबई आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. सध्या, राज्यात सुमारे 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्यामुळे आम्ही सर्व पॉझिटिव्ह नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवू.’, असे ते म्हणाले.

दरम्यान, दररोज अनेक जणांचा मृत्यू होत असून मृतदेहांचा खच पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून औषधे आणि खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली केली.