“…..ते महाराष्ट्राच्या कानफाटात मारतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाल चोळत विधिमंडळात जातात” : ‘यांचा’ हल्लाबोल!
मुंबई: महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार कर्नाटक विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊतयांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे.
राऊत म्हणाले, “एक इंचही जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची बाजूच्या राज्यांनी केली नव्हती. दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक आहेत. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून महाराष्ट्राच्या कानफाटात मारतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाल चोळत विधिमंडळात जातात, अशी टीका राऊतांनी शिंदेवर केली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “तुम्ही या प्रश्नावर भूमिका घेत नसाल, तर तुम्ही मुख्यमंत्रीपदावर बसण्यास योग्य नाही. तुम्ही इतर सगळ्या विषयांवर तासभर बोलता मग सीमाप्रश्नाबाबत तुम्ही बोलत का नाहीत? तुमची मजबुरी काय आहे. सरकारच्या तोंडात कुणी बोळा कोंबलाय?” असा सवाल देखील संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.