बीड: बीड जिल्ह्यात एका 55 वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी अन कर्जबाजारी पणाला कंटाळून, गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुग्रीव वाघमारे वय 55 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, बीडच्या कळसंबर गावात रात्री 11 वाजता उघडकीस आली आहे. मयत सुग्रीव वाघमारे यांनी, गेल्या काही वर्षांपासून नापिकीमुळे झालेले नुकसान आणि कर्जाचा झालेला डोंगर, या बाबीला कंटाळुन स्वतः च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. तसेच, सुग्रीव वाघमारे यांच्याकडे नेकनुर येथील एस.बी.आय बँकेचे दिड लाख रुपये कर्ज आहे. तर इतर खाजगी व्यवहार देखील असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली आहे.