औरंगाबाद: औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, औरंगाबादमधील उद्योगनगरी वाळूजमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटार सायकलवर बसवून खुलताबाद येथील धाब्यावर नेले. व त्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार केला. तसेच, यापुर्वी देखील त्याने गेल्या दोन वर्षापासून तीन ते चार वेळा त्याच धाब्यावर घेवून जावून बलात्कार केला होता.

दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून, आरोपी शिवा याला ताब्यात घेतले आहे.