मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाने कहर केला असून लाखो लोकांना घरात कैद करण्यात आलं आहे. ब्राझीलमध्येही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेना दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये इतर देशांतील कोविड 19 परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. यानंतर परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो. देशात सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 112 इतकी आहे.

दरम्यान, चीनमध्ये गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रुग्णांची आणि मृतांची संख्या इतकी वाढली आहे की, रुग्णालय आणि अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी मोठी लाट चीनमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.