मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहेत. कारण, महाराष्ट्राला इंचरभरही जमीन देणार नाही या भूमिकेचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुरूच्चार केला आहे.
माहितीनुसार, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संपलेला आहे, महाराष्ट्राला एक इंचभरही जमीन देणार नाही, असं ठामपणे सांगितले. तसेच यापूर्वी देखील अशा आशयाचे ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले आहेत. याच भूमिकेचा पुनरूच्चार करणारा ठराव पुन्हा मांडण्यात येईल, असंही बोम्मई यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतलेल्या या भूमिकेला विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते सिध्दरामय्या यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळून येण्याची चिन्ह आहे.