सुषमा अंधारे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून केली मोठी मागणी!
नागपूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संतांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून सुषमा अंधारे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
माहितीनुसार, वारकऱ्यांच्या संघटनांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सुषमा अंधारे यांनी संतांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर कारवाई करायला हवी. तसेच हिंदू देवतांवर केलेली वक्तव्य खपवून घेऊ नयेत, अशी मागणी वारकरी संघटनेकडून यावेळी करण्यात आली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्यामुळे भोसले महाराजांनी नाराजीही व्यक्त केली. तसेच या पुढे जोपर्यंत सुषमा अंधारेची पक्षातून हकालपट्टी होत नाही, तो पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मतदान करण्याचा निश्चयही केला. तसेच, श्रीराम,शंकर आणि हनुमान या हिंदू देवतांवर केलेली वक्तव्य खपवून घेऊ नयेत, अशी मागणी वारकरी संघटनेने नागपुरात मुख्यमंत्र्यांना केली.