मुंबई : पठाण चित्रपटामुळे आता अभिनेता शाहरुख खान याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यामुळे आता संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी थेट शाहरुख खान जिवंत जाळून टाकण्याची धमकी दिली आहे.
अयोध्यातील संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी म्हटले की, माझे काही माणसे हे शाहरुख खान याचा शोध घेत आहेत. शाहरुख खान हा भेटला की, त्याला जिवंत जाळायचे आहे. पठाण चित्रपटामध्ये भगव्या रंगाचा अपमान केला आहे. हा एक विचार करून केलेला मोठा प्लॅन आहे. हिंदु लोकांच्या भावनांशी खेळणे हा एक धंधाच झाला आहे. पैसे कमावण्यासाठी असे प्रकार केले जात आहे.

दरम्यान, आज शाहरुख खान याचे पोस्टर जाळले आहे. जेंव्हा तो प्रत्यक्ष भेटेल तेंव्हा या जिहादीला जिवंत जाळणार आहे, असेही अयोध्यातील संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी वक्तव्य केले.