मुंबईः राज्यातील जवळ जवळ 7 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही या निवडणुकीत आम्हीच बाजी मारली असल्याचा दावा केला. त्याविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावेळी संजय राऊत म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल हा पक्षीय लेबलवर अवलंबून नसतो. त्यामुळे विधानसभा, लोकसभा या निवडणुकांवर या निकालाचा काही एक परिणाम होणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला असला तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनेही अनेक ग्रामपंचायतींवर यश मिळवले आहे. त्यामुळे एकाच पक्षाची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे असं म्हणणं चुकीचे आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.