Latest Marathi News

सावधान! ‘येथे’ कोरोना रुग्णांत वाढ; खाटांचा तुटवडा: केंद्र सरकारने राज्यांना दिले ‘हे’ निर्देश

0 915

नवी दिल्ली: चीनमध्ये पुन्हा एकदा रुग्णालयातील कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की खाटांचा तुटवडा पडत आहे. रुग्णांवर जमिनीवर झोपवून उपचार केले जात आहेत. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचीही कमतरता भासत आहे. औषध आणि ऑक्सिजनचं संकट वाढत आहे.

 

सावधान! राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, जपान, अमेरिका, कोरिया, ब्राझील आणि चीनमधील कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत असल्याने जीनोम चाचणीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सर्व राज्यांना विनंती करण्यात येते की, शक्यतोपर्यंत, सर्व संक्रमित प्रकरणांचे नमुने दररोज INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग लॅबोरेटरीजला पाठवले जातील.

Manganga

 

दरम्यान, जगातील अमेरिका, जपान, चीन, कोरिया आणि ब्राझीलमधील वाढत्या कोरोना केसेसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून याबाबत सतर्क केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!