आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायतसाठी होणार ६ फेऱ्यात मतमोजणी : जांभुळणी, घाणंद, कामथ, पिंपरी बु., वलवणच्या मतमोजणीने सुरूवात होणार
आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतसाठी आज मतमोजणी संपन्न होणार आहे. सदरची मतमोजणी ही आज मंगळवारी आट्पाडीतील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात होणार आहे.
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतसाठी आज मतमोजणी संपन्न होणार आहे. सदरची मतमोजणी ही आज मंगळवारी आट्पाडीतील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात होणार आहे.
सकाळी १० वाजल्यापासुन मतमोजणीला सुरूवात होत असून १५ टेबल आणि ६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी येणार आहे. आटपाडी तालुक्याळतील २५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी अत्यंत चुरशीन ८५ टक्के इतके मतदान झाले. या मतदानाची मोजणी आज मंगळवारी होत आहे.

१५ टेबलवर पहिल्या फेरीत जांभुळणी, घाणंद, कामथ, पिंपरी बु., वलवणच्या मतमोजणीने सुरूवात होणार आहे. दुसर्याण फेरीत पारेकरवाडी, यपावाडी, कौठुळी, तडवळे, आवळाईची मतमोजणी होणार आहे. तिसर्याा फेरीत पळसखेल, गळवेवाडी, माळेवाडी, माळेवाडी, बाळेवाडी, हिवतडची मतमोजणी होणार आहे. चौथ्या फेरीत पुजारवाडी दि, उंबरगाव, पडळकरवाडी, लिंगीवरेची मोजणी होणार आहे. पाचव्या फेरीत खरसुंडी, झरे, गोमेवाडी व कुरुंदवाडी ची मोजणी होणार आहे. सहाव्या फेरीत दिघंची ची मतमोजणी होणार आहे.