आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीची आज मतमोजणी
आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतसाठी आज मतमोजणी होणार आहे. यावेळी पुन्हा थेट सरपंचपद निवडणूक असल्याने मोठ्या प्रमाणात गावागावत चुरस निर्माण झाली आहे.
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतसाठी आज मतमोजणी होणार आहे. यावेळी पुन्हा थेट सरपंचपद निवडणूक असल्याने मोठ्या प्रमाणात गावागावत चुरस निर्माण झाली आहे.
तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यासाठी रविवारी मतदान झाले. आज मंगळवारी या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत तालुक्यात सरासरी ८० टक्के मतदान झाले होते.

राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आले. यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात याकडे तालुक्यातील अनेकांचे लक्ष लागलं आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा कि शिवसेना (शिंदे गट) समोर येणार हे समजणार आहे.
फोटो : गोपीचंद पडळकर अमरसिंह देशमुख तानाजीराव पाटील