Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सावरकरांचा फोटोला काँग्रेसचा निषेध :” ….मग दाऊदचा फोटो लावायचा का?”!

0 262

बंगळुरू: कर्नाटकाच्या विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो लावल्याने राज्य सरकारच्या या कृतीचा काँग्रेसने निषेध नोंदवला आहे. सावरकर ही वादग्रस्त व्यक्ती होती. त्यांचा फोटो असेंबली हॉलमध्ये लागता कामा नये, असं काँग्रेसने म्हटलंय. तर सावरकरांचा फोटो लावायचा नाही तर काय दाऊदचा फोटो लावायचा का? असा सवाल भाजपने केला आहे.

 

 

माहितीनुसार, आज सकाळी कर्नाटकाच्या विधानसभेच्या असेंबली हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या फोटोचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांच्यासह काँग्रेस आमदारांनी जोरदार निदर्शने केली. काँग्रेस आमदारांनी या संदर्भात कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना पत्रंही लिहिलं.

 

दरम्यान, सावरकरांचा फोटो लावल्याने तुम्हाला दु:ख झालं. सिद्धरामैय्या यांना विचारा मग विधानसभेत दाऊद इब्राहिमचा फोटो लावायचा आहे का? काँग्रेस लांगूलचालन करण्याचं राजकारण करत असते. तीच त्यांची समस्या आहे. त्यामुळेच देशाची ही अवस्था झाली आहे, असा हल्लाबोलही जोशी यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.