अकोला: अकोल्यातील पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नऊ वर्षीय लहान मुलाला पतंगाचं आमिष दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी आकाश खोडे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, नऊ वर्षाचा मुलगा बाहेर खेळायला जातो म्हणून घरून निघून गेला होता. जवळच असलेल्या इस्त्रीच्या दुकानावर दोन माणसे उभी होती, त्यापैकी एका माणसाने तुला झाडाला अडकलेली पतंग काढून देतो असे म्हणून एका खोलीमध्ये त्या मुलाला घेऊन गेला आणि अनैसर्गिक संभोग केला. तसेच, त्या मुलाला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री साडे ७ वाजता पीड़ित अल्पवयीन मुलगा घरी रडत रडत घरी आला आणि घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. लागलीच कुटुंबीयांनी पातूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध कलम ३७७ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरोपीला अकोला जिल्हा न्यायालयाने २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.