अमरावती: शहरालगत असलेल्या नागपूर मुंबई महामार्गावर ट्रक व कारच्या भीषण अपघातात कारचा चक्काचूर होऊन युवक व अल्पवयीन मुलगी मृत्यूमुखी पडले. या अपघातात आदित्य विश्वकर्मा (वय 19) याचा मृत्य झाला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत त्यांनी संबंधित मृत्यमुखी पडलेल्या मुलीला त्यांनी शिवाजी विज्ञान महाविद्यालयात नेऊन सोडले व ते घरी परतले. त्यानंतर आदित्य विश्वकर्मा याने तिला तिच्या महाविद्यालयातून फुस लावून पळवून नेले. त्यानंतर नागपूर अमरावती महामार्गावर कोंडेश्वर जवळ त्यांचा अपघात झाला. हा अपघात आदित्यच्या निष्काळजीपणामुळे झाला असा आराेप देखील मुलीच्या वडिलांनी केला आहे. तसेच त्याने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडक मारली. त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्यूला आदित्य कारणीभूत आहे असेही त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, बडनेरा पोलिस अधिक तपास करत आहेत.