नागपूर : शिवसेना या पक्षाची ताकद जून महिन्यात दोन गटात विभागली गेली. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड पुकारलं. त्यानंतर ठाकरेगट आणि शिंदेगट अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली. त्यानंतर काही दिवसात शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेलं धनुष्यबाणही गोठवण्यात आले. या सगळ्यामोडींनंतर आता शिवसेनेचं पक्ष कार्यालयही शिंदेगटाच्या ताब्यात गेले आहे.
माहितीनुसार, सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनावेळी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात बदल करण्यात आलेत. शिवसेनेचं पक्ष कार्यालय आता शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले आहे. आमदारांची संख्या पाहता नागपूर विधिमंडळातील हे कार्यालय शिंदेगटाला देण्यात आले आहे.

दरम्यान, शिवसेनेचं पक्ष कार्यालय शिंदेगटाकडे गेल्याने त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.