मुंबई: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्यभरातील, आमदार, मंत्री हजर झाले आहेत. तसेच, यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला आमदार सरोज अहिरे यांच्या अडीच वर्षाच्या बाळाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
याबद्दल बोलताना त्यांनी “माझ्यासारख्या करोडो महिला ज्या शिक्षिका आहेत, नर्स आहेत त्या आपल्या बाळाला घेवून काम करत असतात. माझ्या मतदार संघातील प्रश्न सुटले पाहिजेत, ते मांडले पाहिजेत यासाठीच मी माझ्या बाळाला घेवून आली आहे. माझ्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत,” अशी प्रतिक्रिया सरोज अहिरे यांनी दिली आहे.
दरम्यान, सरोज अहिरे नाशिक जिल्ह्यातील देवराळी मतदारसंघाच्या आमदार आहेत.