मुंबई: आज भारताला अभिमान वाटावा अशी गोष्ट घडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण फिफा ट्रॉफीचे अनावरण करणारी पहिली भारतीय ठरली. भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपिकाने फिफा विश्वचषक ट्रॉफीला एका खास ट्रकमधून लुसेल स्टेडियममध्ये नेले आणि त्या ट्रॉफीचे अनावरण केले.
6.175 किलो वजनाची आणि 18-कॅरेट सोने आणि मॅलाकाइटने बनलेल्या ट्रॉफीचे अनावरण करणे हा सामना सुरू होण्याआधी केला जाणारा समारंभाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे भारतासाठी हा एक जागतिक क्षण होता. दीपिका पदुकोणने स्पॅनिश व्यावसायिक फुटबॉलपटू, इकर कॅसिलास फर्नांडीझसह मैदानात फिफा ट्रॉफी घेऊन प्रवेश केला.

दरम्यान, लक्झरी ब्रँड आणि अगदी पॉप कल्चर ब्रँडसाठी जागतिक चेहरा म्हणून निवडलेली दीपिका पदुकोण ही एकमेव भारतीय आहे.