मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून खास रणनीती ठरवण्यात आली आहे. त्याच दरम्यान शिंदे- फडणवीस सरकारनेही विरोधकांच्या रणनितीला प्रतिउत्तर देण्यासाठी खास योजना आखली आहे.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने सामने येणार आहे. आदित्य ठाकरे देखील नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमानावरून आणि सीमा प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. लोकायुक्त कायद्याचं विधेयकदेखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झाले आहे. महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे दिसले. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. ते आज पहिल्याच दिवशी दिसून आले.