मुंबई: महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झाले आहे. महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे दिसले. तर दुसरीकडे आक्रमक झालेल्या विरोधकांना सरकारकडून ‘जशास तसे’ उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. ते आज पहिल्याच दिवशी दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांनी पहिल्याच दिवशी शिंदे आणि फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभांच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ५० खोके, एकदम ओके अशा घोषणांचे बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजीही केली.

दरम्यान, विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले असून, महापुरुषांबद्दल सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा गाजणार आहे.