नवी दिल्ली: जम्मूच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड हा ‘किताब जिंकून भारताच्या बहुमानात मनाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत ६३ देशातील महिला सहभागी झाल्या होत्या. २१ वर्षांनी भारताला हा बहुमान मिळाला आहे.
माहितीनुसार, ३२ वर्षीय सरगम कौशल मूळ जम्मू-काश्मीरची आहे. सरगमने इंग्रजी साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. सरगम विशाखापट्टनम शिक्षिका म्हणून काम केले आहे. २००८ साली सरगम कौशलचे लग्न झाले. तिचे पती इंडियन नेव्हीमध्ये आहे.

दरम्यान, मिसेस वर्ल्ड ही स्पर्धेचे नाव पहिले मिसेस अमेरिका होते. त्यानंतर ते बदलून ‘मिसेस वूमन ऑफ द वर्ल्ड’ करण्यात आले.