Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, सोमवार १९ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 880

 

मेष:-

Manganga

बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. दिवस चांगला जाईल. संमिश्र घटनांचा दिवस. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.  जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

 

 

वृषभ:-

सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात. आरोग्यात सुधारणा संभवते. उगाचच वादात अडकू नका. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी.

 

 

मिथुन:-

शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन संधी दार ठोठावेल. जुगारातून लाभ संभवतो. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस.

 

 

कर्क:-

वैचारिक दिशा बदलून पहावी. अधिकाराचा अति वापर टाळावा. आत्ममग्न राहाल.  दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

 

 

सिंह:-

मनातील अनामिक भीती काढून टाकावी. कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.  कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील.

 

 

कन्या:-

रागावर नियंत्रण ठेवा. कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

 

 

तूळ:-

इतरांना सल्ले द्यायला जाल. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो. एखादी घटना मन विचलीत करू शकते. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल.

 

 

वृश्चिक:-

मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. लोकांवर अवलंबून राहू नका. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये. पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे.

 

 

धनू:-

कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. दूरदृष्टी ठेवून विचार करावा. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका. योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा.

 

 

मकर:-

कामातील उत्साह वाढीस लागेल. जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. दिवस धावपळीत जाईल. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

 

 

कुंभ:-

आवडीच्या वस्तु खरेदी कराल. फसवणुकीपासून सावध राहावे. मानसिक शांतता जपावी. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखावा.

 

 

मीन:-

उत्साहाने कामे हाती घ्यावीत. कामात मित्रांचा सल्ला घ्याल. भडक विचार मांडू नका. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वैचारिक समतोल साधावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!