आटपाडी तालूक्यातील ग्रामपंचायतीसाठी ८०.८३ टक्के मतदान : पडळकरवाडी, झरे, गळवेवाडी, कौठूळी, आवळाई मध्ये किरकोळ वादावादी : इतर ठिकाणी शांततेत मतदान
आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान संपन्न झाले. तालुक्यातील पडळकरवाडी, झरे, गळवेवाडी, कौठूळी, आवळाई मध्ये किरकोळ वादावादी वगळता इतर ठिकाणी शांततेत मतदान संपन्न झाले. तालुक्यातील एकूण ८०.८३ टक्के सरासरी मतदान संपन्न झाले.
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान संपन्न झाले. तालुक्यातील पडळकरवाडी, झरे, गळवेवाडी, कौठूळी, आवळाई मध्ये किरकोळ वादावादी वगळता इतर ठिकाणी शांततेत मतदान संपन्न झाले. तालुक्यातील एकूण ८०.८३ टक्के सरासरी मतदान संपन्न झाले.
यामध्ये दिघंची ७५६३, पुजारवाडी (दि.) १५५९, उंबरगाव १४६३, राजेवाडी १९४०, लिंगीवरे १९७६, तडवळे १६२०, वलवण १२३५, खरसुंडी ३३६६ बाळेवाडी, १३६५, गोमेवाडी २६१०, हिवतड, २१०४ जांभूळणी १३०५, घाणंद १३७७, कामथ ९८५, पिंपरी ब्रू. १०१७, पडळकरवाडी ५६१, झरे २४३९, कुरुंदवाडी १९२, पारेकरवाडी, ७६४, य.पा.वाडी १२५८, कौठूळी २०४२, आवळाई १९४३, पळसखेल १०५०, गळवेवाडी १६७५, माळेवाडी ८७२ असे मतदान संपन्न झाले आहे.

एकूण मतदान ५४७८२ पैकी ४४२८१ मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पडले. त्यामुळे तालुक्यात सरासरी ८०.८३ टक्के मतदान झाले आहे.