नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘अजित दादांनी आज पत्रकार परिषदेत आरोप केले आहेत. मी सांगू इच्छितो अजित दादा, हे सरकार लोकांच्या जनहिताचा आदर करून हाऊसमध्ये बहुमताने स्थापन झालं. २०१९ साली जे सरकार स्थापन झालं, ते पूर्ण अनैतिक होतं. सोयरीक एकाशी आणि संसार दुसऱ्याशी थाटला. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘अजित दादांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. खोक्याची भाषा ते करत आहेत. खोक्यांवर खोके लावले तर, ते मोठं शिखर गाठतील. आम्हाला राज्याचा काही लवासा करायचा नाही. आम्ही ७० टक्के कामांवरच स्थगिती उठविली आहे. सूड बुद्धीने आम्ही काम करत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.