नागपूर: हिवाळी अधिवेशानाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांनी पुन्हा याबाबत विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या मुद्द्यावरुन स्पष्टीकरण दिले आहे.
फडणवीस म्हणाले,“मध्य प्रदेश सरकारने कोविड काळात शेतकरी अडचणीत असल्याने कोविड काळातील वीज बिल वसुली रद्द केली होती. तशी महाराष्ट्राने करावी अशी मागणी मी केली होती. तशी वीज बिल वसुली तत्कालीन सरकारने रद्द केली का? असा प्रश्नही त्यांनी केला.

तसेच ते पुढे म्हणाले, “मध्य प्रदेश सरकारने वीज बिल वसुली पूर्ण थांबवलेली नाही. केवळ कोविड काळातील वीज बिल वसुली थांबवली होती. मात्र आज तो व्हिडीओ कितीही दाखवला तरी तेव्हा सरकार आमचं नव्हतं. तेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं आणि त्यांनी शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही”, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.