नवी दिल्ली: आजमगड येथील एका युवकाने चक्क नॅनो गाडीला हेलिकॉप्टर बनवले आहे. या गाडीतून प्रवास करताना त्यांना हेलिकॉप्टरचा अनुभव घेत आहेत. हे हेलिकॉप्टर जेव्हा रस्त्यावर आलं तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पाहातच राहिले.
माहितीनुसार, आजमगड येथील सलमान नावाच्या युवकाने 6 सीटर इलेक्ट्रिक बाइक तयार केली होती. सलमानने भंगारातील काही वस्तूंचा वापर करुन जुगाड केला आहे. त्याने त्याच्या कारचे हेलिकॉप्टरमध्ये रूपांतर केले आहे.त्याने यामध्ये सुंदर लाइट्स देखील लावल्या आहेत. सलमानने बनवलेल्या या हेलिकॉप्टरची सोशल मीडियावर चर्चा आहे.

दरम्यान, लोकं गाडीत बसून हेलिकॉप्टर अनुभवत आहेत.त्यामुळे परिसरात याची जोरदार चर्चा आहे.