आटपाडी तालुक्यात दुपारपर्यंत ५१.४२ टक्के मतदान
आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत साठी आज मतदान सुरु आहे. तालुक्यातील दिघंची, खरसुंडी, झरे या मोठ्या ग्रामपंचायतीसह एकूण २५ ग्रामपंचायतसाठी मतदान सुरु असून तालुक्यात दुपारपर्यंत सरासरी ५१.४२ टक्के मतदान झाले आहे.
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत साठी आज मतदान सुरु आहे. तालुक्यातील दिघंची, खरसुंडी, झरे या मोठ्या ग्रामपंचायतीसह एकूण २५ ग्रामपंचायतसाठी मतदान सुरु असून तालुक्यात दुपारपर्यंत सरासरी ५१.४२ टक्के मतदान झाले आहे.
आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतसाठी एकूण ८६ मतदान केंद्र आहेत. यामध्ये ५४७८२ मतदार संख्या असून यामध्ये पुरुष मतदार २८६८६ तर स्त्री मतदार २६०८६ आहे. तालुक्यातील २५ ग्रामपंचायत मध्ये आज दुपार १.३० पर्यंत २८१६७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष मतदार १४२७५ व स्त्री मतदार १३८९२ आहेत. तालुक्यातील मतदार केंद्राला रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी ठिकठिकाणी भेटी देवून मतदानाची माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
