“…यापुढे ऐतिहासिक चित्रपटातील भूमिका बापजन्मात करणार नाही”: ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून सुबोध भावेचा मोठा निर्णय!
कोल्हापूर: ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादादरम्यान सुबोध भावेने मोठा निर्णय घेतला आहे.
सुबोध भावे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांवरील माझं प्रेम आयुष्यभर राहील. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं, ते मी मरेपर्यंत करत राहणार. पण यापुढे ऐतिहासिक चित्रपटातील भूमिका बापजन्मात करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक असेल”, असे म्हणत सुबोधने शिवभक्तांसमोर हात जोडले.

दरम्यान, हर हर महादेव’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अद्यापही थांबलेला नसून संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटात दाखवलेल्या इतिहासावर आक्षेप नोंदवत आता झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याने पुन्हा वाद चर्चेत आला. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही शिवभक्तांनी अभिनेता सुबोध भावेची भेट घेतली. या भेटीदरम्यान आणि हर हर महादेव या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादादरम्यान सुबोधने मोठा निर्णय घेतला आहे.