नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील राजमिलन येथील रहिवासी दिनेश शहा यांचं चहाचं दुकान आहे. या दुकानात चहाची नावं वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने ठेवण्यात आली आहेत.
माहितीनुसार, दिनेश शहा यांचं दुकान राजमिलन गावात आहे. टपरीच्या नावाने हे चहाचे दुकान आहे. या चहाच्या दुकानात चहाच्या दरातही सवलत आहे, पण ती फक्त प्रेमात धोका मिळालेल्यांसाठीच. ज्यांनी प्रेमात धोका खाल्लाय फक्त त्यांच्यासाठी खास 10 रुपयांत चहा मिळतो. त्याचबरोबर प्रेमी युगुलांना 15 रुपयांत चहा मिळतो. याशिवाय सर्वसामान्यांसाठीही स्वतंत्र दर निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान, चहावाल्याची ही अनोखी स्टाईल सर्वांनाच पसंत पडलीये, लोकही चहा पिण्यासाठी इथे लांबून लांबून येत आहेत. संध्याकाळी दुकानात बरीच गर्दी जमा होत आहे.