‘त्यांची बुद्धीचं नॅनो आहे कारण ते मधल्या काळात दिल्लीला ..’: ‘या’ वक्तव्यावरून संजय राऊतांची फडणवीसांवर टिका!
मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत महामोर्चा काढण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या या महामोर्चाला नॅनो मोर्चा होता असे म्हणत त्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी खिल्ली उडवली होती. दरम्यान, या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार टिका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस अनेक वर्ष राजकारणात आहेत मात्र त्यांना हा विराट मोर्चा दिसला नाही. त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नाही. हेच विधान जर शिवसेनेतील फुटलेल्या ४० आमदारांपैकी कोणी केले असते तर मी समजू शकलो असतो,” अशी खरमरीत टिका केली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “त्यांची बुद्धी नॅनो आहे. मधल्या काळात ते दिल्लीला गेलेले होते. त्यावेळी त्यांना गुंगीचे औषध दिले असेल. मुळात हा मोर्चा राजकारणासाठी नव्हता, हा मोर्चा महापुषांसाठी होता. फडणवीस यांनी स्वतःची अवहेलना करु नका. ज्यांनी महाराष्ट्राचे राजकारण केले ते पाचोल्यासारखे उडून गेले. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार,” असल्याची टिका केली आहे.
दरम्यान, साताऱ्यातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.