माणदेश एक्सप्रेस न्युज
राजेवाडी/देवानंद जावीर : राजेवाडी ग्रामपंचायत साठी मतदान सुरू झाले असून सकाळच्या सत्रात मतदानाला मतदारांनी गर्दी केली होती.
राजेवाडी ग्रामपंचायत साठी सकाळी ०७.३० वा. मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. सकाळपासून ११.३० पर्यंत मतदारांनी मतदानासाठी सुरुवातीला गर्दी केली.

आज सकाळी ११.३० पर्यंत वार्ड क्रं 1मधे पुरुषांचे 157 तर महिलांचे मतदान 114 असे एकूण वार्ड क्रमांक एक मध्ये 271 मतदान झाले. तर वार्ड क्रमांक दोन मध्ये पुरुष मतदान 148 महिला मतदान 112 असे एकूण 226 मतदान झाले. वार्ड क्रमांक तीन मध्ये पुरुष 136 महिला 100 असे एकूण 236 एवढे मतदान झाले.
दुपारपासून पुढे तुरळक मतदान सुरुवात झाली. राजेवाडी मतदान केंद्राचे एकूण मतदान 767 असे मतदान झाले.