सांगली: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हजारोच्या संख्यने पोलीस कर्मचारी गावागावामध्ये तैनात करण्यात आले आहे. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येने आहेत.
राज्यतील ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी आज रविवार 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तर 20 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विविध जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होणरा आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या: आटपाडी २६, जत ८१, कडेगाव ४३, कवठे महाकाळ २९, खानापूर ४५, मिरज ३८, पलूस १६, शिराळा ६०, तासगाव २६, वाळवा ८८. दरम्यान, या ग्रामपंचायती मतदार राजा कुणाच्या हाती देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.