आम. गोपीचंद पडळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पडळकरवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान संपन्न होत असून याठिकाणी आम. गोपीचंद पडळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पडळकरवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान संपन्न होत असून याठिकाणी आम. गोपीचंद पडळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
पडळकरवाडी ग्रामपंचायतसाठी आम. गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक लढवत आहेत. सुरुवातीला त्या बिनविरोध सरपंच होतील असे वातावरण असताना या ठिकाणी स्थानिक पातळीवर वाद न मिटल्याने या ठिकाणी निवडणूक लागली आहे.

त्यामुळे या निवडणुकीसाठी आम. गोपीचंद पडळकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही सदृढ रहावी यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. आज मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतीची मतमोजणी ही २० डिसेंबर रोजी संपन्न होत होणार आहे.