मुंबई: अकोला शहरात दोन अल्पवयीन मुलींना शितपेयांतून दारू आणि गुंगीचे औषध देवून सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यातील एक मुलगी 15 आणि एक 17 वर्षे वयाची आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, 16 डिसेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक ओळखी युवक भेटला. लीप्ट देण्याच्या बहाण्याने या युवकाने त्यांना सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या ‘पवन वाटिके’त घेऊन गेला. त्यानंतर तेथे त्याने या दोघींना चॉकलेट आणि शितपेय प्यायला दिले. शितपेय प्यायल्यानंतर त्यांना गूंगी यायला लागली. यानंतर त्या दोघींवरही त्याने अत्याचार केले. यानंतर त्याचा मित्रही तिथे आला आणि त्यानेही दोघींवर अत्याचार केले. या संपूर्ण प्रकरणात चार ते सहा जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ऋषिकेश, करण आणि रोहित अशी तिघा संशयितांची नावे आहेत.