मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवायचं असेल तर आतापासून कामाला लागा. आरएसएस मुख्यालयात एके ४७ यांच्याकडे आली कशी याची चौकशी केली पाहिजे. दुसरीकडे चीनबरोबर १५ दिवसांपूर्वी जे भांडण झालं, त्याची चर्चा पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत होऊ दिली नाही, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे चोर आहेत. २०२४ ला सत्ता बदल्यास सगळ्यात मोठे आरोपी मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी राहतील. नोटा रद्द केल्याची केस चालू झाली आहे. कोर्टाने सांगितले की, पंतप्रधानांपेक्षा जास्त आम्हाला अधिकार नाही. नोटा काढण्याचा अधिकार पंतप्रधान यांचा की रिझर्व्ह बँकेचा? एखादी नोट खराब झाली तर कोण बदलतं ? रिझर्व्ह बँक बदलते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमधील धम्म मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले.त्यावेळी ते बोलत होते.