मुंबई: सत्ताधाऱ्यांकडून वारंवार महापुरूषांचा होणारा अपमान, वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात शनिवार (१६, डिसेंबर) ला महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “रोज बाबासाहेबांचा, संतांचा अपमान करणारेच मोर्चे काढत आहेत. ज्यांना बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला माहित नाही त्यांना मोर्चा काढण्याचा काहीही अधिकार नाही,” असे म्हणत सावरकरांचा अपमान होताना तुम्ही कोठे होता असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंना केला.

तसेच ते पुढे म्हणाले, “तीन पक्ष मिळून फक्त एवढीच गर्दी जमवली, आणि गर्दी कमी असल्यामुळेच ड्रोन शॉट घेतला जात नाही असे म्हणत हा तर तीन पक्षांनी मिळून काढलेला नॅनो मोर्चा होता,” अशा शब्दात या मोर्चाची फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाना पटोले असे मोठे नेते सहभागी झाले होते.