नाशिक : महाविकास आघाडीचा मुंबई येथे महामोर्चा होता. त्यावर आणि महाविकास आघाडीतील समावेश का आडला यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “हा मोर्चा महाविकास आघाडीचा आहे. आम्हाला घ्यायला मतभेद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला घ्यायला विरोध आहे. त्यामुळे आमच्या जाण्याचा संबंध येत नाही, आम्हाला सोबत घेण्याबाबत उध्दव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचं नाही. असं प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये म्हंटलं आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे, त्यांना गरीब मराठा देखील चालत नाही, मी एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो नाही, ते राजगृहावर भेटायला आले, एक कुटुंब म्हणून आम्ही स्वागत केलं, इंदू मिल संदर्भात विषयांवर चर्चा झाली, एक गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे, महापुरुषांनी आदर्श समाजात ठेवला आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.