मुंबई : महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढला आहे. या मोर्चावर शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट टीका केली आहे.
शिरसाट म्हणाले, “राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांनी मोर्चा काढला असला तरी, त्यांची मतं मात्र वेगळी आहेत. त्यांच्यात मतभेद आहेत, अनेक लोक मोर्चापासुन पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या मोर्चात सहभागी व्हायचं नव्हतं. पण त्यांना जबरदस्तीने आणलं गेलं आहे, तसेच, नाना पटोलेंसारखा निष्ठावंत, स्वाभिमानी नेता बळजबरीने महामोर्चामध्ये सहभागी झाली आहेत”, असे शिरसाट म्हणाले आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले, “संजय राऊत स्वतःला स्टार प्रचारक समजतात, त्यांनी बेताल व्यक्तव्य केली. त्यांच्याबद्दल बोलायची आम्हाला लाज वाटत आहे, असे म्हणत शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
दरम्यान, या मोर्चासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे पवार कुटुंबातील प्रमुख नेते उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील नेते आणि सदस्यही उपस्थित होते.